| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघटनेच्यावतीने होणाऱ्या टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा संघ जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी निवड चाचणी स्पर्धा दि. 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीमध्ये 19 वर्षाखालील संघाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असो. व सातारा जिल्ह्यातील असो. यांच्या विद्यमाने दि. 18 ते 21 डिसेंबर दरम्यान सातारा येथे 19 वर्षांखालील 5 वी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 19 वर्षांखालील गटात रायगड जिल्ह्यातील मूल व मुलींचा संघ सहभागी होणार आहे. कर्जत-नेरळ येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणीसाठी मुंबई विभाग प्रमुख संदीप पाटील उपस्थीत राहणार आहेत.
ज्या खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतरचा असेल अशा खेळाडूंनी दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून साडेअकरा वाजेपर्यंत नेरळ येथील धामोते गावातील बी.एस.टी स्कूल शेजारील मैदानात उपस्थित राहून नाव नोंदणी करून घ्यायचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







