| खांब | प्रतिनिधी |
दीपक फाउंडेशन रोहा आणि ॲपकोटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून उमरोली व देहरंग येथील जि.प. शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे उमरोली शाळेत वॉटर फिल्टर तर देहरंग शाळेत सौर ऊर्जेवर चालणारी ऑफ-ग्रिड प्रणाली आणि संगणक यंत्रणेचे स्थापत्य पूर्ण करण्यात आले.
या कार्यक्रमास अपकोटेक्स कंपनीचे प्लांट हेड जी.आर. मनमोडे, सेफ्टी हेड के. एन. तंगडे, एचआर हेड अमृत अंबुलकर, प्लांट हेड एस.जी.बरई, मॅनेजर इनिशिएटिव्हज एस.पी.पेणकर आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी नव्या सुविधांचे स्वागत करताना अपकोटेक्सच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. दीपक फाउंडेशन रोहा यांच्यातर्फे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरज्ञअनिकेत निकम व प्रोग्राम मॅनेजर अभिलाष नस्वले यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट समन्वयन केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी या सुविधा अत्यंत उपयुक्त आहेत. अपकोटेक्स व दीपक फाउंडेशनने दाखवलेली सामाजिक बांधिलकी हा आदर्श उपक्रम आहे.
– निशा माळी, शा.व्य.समिती सदस्या
