तहसीलदार घारे यांची प्रांतपदी नियुक्ती

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यात तीन वर्षे पारदर्शक सेवा करणारे तहसीलदार समीर घारे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. घारे यांनी म्हसळा तालुक्यात अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्यात. पूर परिस्थितीत तालुक्यातील प्रत्येक खेड्यात भेटी देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. तालुक्यातील सर्वसामान्य लाभर्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले. काही वेळा तर एच.एस.एम. लॉगिंगमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑफलाईन दाखले देण्याची व्यवस्था केली. त्यांनी दीड वर्षे मुंबई येथे निवडणूक तहसीलदार म्हणूनही उल्लेखनीय काम केले असून या सर्व बाबींचा विचार करुन समीर घारे यांना सावंतवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे त्यांच्या मित्र मंडळी, आप्तेष्ठ आणि हितचिंतक यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version