। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यात सुसज्ज शासकीय रूग्णालयात होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ज्येष्ठ पत्रकार, कुस्तीपटू हनुमंतराव ओव्हाळ यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. तालुक्याचे तहसिलदार आयुब तांबोळी यांनी ओव्हाळ यांच्या कुटूंबाची भेट घेवून सांत्वन केले आहे.
मुंबई – पुण्याच्या मध्यवर्ती खोपोली शहर असल्यामुळे एक्स्प्रेस मोठ्या प्रमाणात अपघात घडतात जखमींना उपचारासाठी खोपोली शहरात सुसज्ज हाँस्पिटल नसल्यामुळे मोठा हाँस्पिटल उभारण्यासाठी अनेक लढा हनुमंत ओव्हाळ यांनी दिला आहे. वेळप्रसंगी प्रशासनाला धारेवर धरत आंदोलन करणारे हनुमंत ओव्हाळ यांचे प्रशासनात आदर होता. खालापूर तालुक्याचे तहसिलदार आयुब तांबोली यांनी ओव्हाळ यांच्या कुटूंबाची भेट यावेळी अपघातग्रस्त टिमचे गुरूनाथ साठेलकर उपस्थित होते.