सुरक्षित ठिकाणी जाण्याची केली सूचना
| रायगड | खास प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील खैरे गावात दरड कोसळण्याची घटना घडली होती. अगदी पावसाला सुरुवात झाल्यानंतरच हा प्रकार समोर आला होता. त्यामुळे दरडींबाबतची दहशत नागरिकांमध्ये होती. सावंत कुटुंबियांच्या राहत्या घराच्या मागे दरड कोसळल्याने महाडचे नायब तहसीलदार बाबासाहेब भाबड यांनी त्यांची भेट घेतली. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, अशी सूचना त्यांनी केली.
पावसाला सुरुवात झाल्याने दरडी पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी अथवा गावातील शाळेत स्थलांतरीत होणे गरजेचे आहे. प्रशासन तुमच्या सोबत आहे, आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना आणि मजत करण्यात येईल, अशी ग्वाही भाबड यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दरडी पडण्याची शक्यता अधिक असते. याआधी मोठ्या दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आधीपासूनच सर्तक झाले आहे.