। म्हसळा । वार्ताहर ।
राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्यात तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. तालुक्यांत 38 ते 40 से. तपमान आसल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक भागांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटत आहेत. सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता असल्याने उष्णतेच्या लाटेचा इशारासुद्धा देण्यात येत आहे.
तालुक्यातील गाव-वाडी-वस्तीवर दुषीत पाणी पुरविले जाण्याच्या शक्यतेमुळे तालुका प्रशासन कटीबद्द झाल्याचे चित्र आहे. नुकतेच म्हसळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महादेव जाधव, ग्रामिण पाणी पुरवठयाचे उपअभियंता जगदिश फुलपगारे आणि आरोग्य विभागाचे मंडळीनी ग्रामपंचायत मेंदडी, मेदडी कोड, वारळ, कळसुरी, तुरुंबाडी येथील पिण्याचे पाण्याचा मुख्य स्रोत असणार्या मेंदडी पाझर तलाव क्षेत्राला भेट देऊन पिण्याचे पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने घेऊन ते मुख्यअनुजीव वैज्ञानिक अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्याकडे पाठविले आहेत.