अलिबाग-मुरुड या मार्गावर जनरेटरची गाडी पलटी;चालक जखमी

Exif_JPEG_420

। आगरदांडा । प्रतिनिधी ।
अलिबाग-मुरुड या मार्गावर जनरेटर घेऊन जाणार्‍या गाडीचा अपघात झाला. यामध्ये गाडी पलटी झाल्याने चालकाला किरकोळ दुखापत झाली. ही घटना मंगळवारी घडली. अलिबाग- मुरुड मार्गावरुन चालक एमएच 06- जी 8887 या गाडीने मुरुड तालुक्यातील तेलवडे येथे कार्यक्रमासाठी जनरेटर घेऊन जात होता.

यावेळी तेलवडे, बौद्धवाडी येथे गाडी मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी 4-5 फुट खड्ड्यात कोसळून पलटी झाली. तसेच समिर पाटील यांच्या घरावर आदळली. यामध्ये घराचे नुकसान झाले तसेच चालक किरकोळ जखमी झाला.

Exit mobile version