| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गवरील खांब ग्रामपंचायतीसमोरील पुलावरून जाणाऱ्या भरधाव टेम्पोन अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून सोमवारी (दि.23) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खांब ग्रामपंचायतीसमोर असलेल्या पुलावरून खांब बाजूकडून कोलाड बाजूकडे गादी घेऊन जाणाऱ्या टेम्पोने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रसंगवधान दाखवत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याची माहिती मिळताच रेक्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. परंतु, तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती.






