| खोपोली | वार्ताहर |
खोपोली शहरातील हायको कॉर्नर दरम्यान मार्निंग वाॅकसाठी गेलेल्या व्यक्तीला टेंपोची धडक लागून अपघात झाला आहे.
सदर अपघात बुधवारी (दि.१) सकाळी सहा वाजताच्या दरम्यान झाला असून माॅर्निंग वाॅकसाटी गेलेल्या दशरथ लहानू बोराडे (वय 54), शांती नगर खोपोली यांना सिल्व्हर कलरच्या टेंपोने धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. जखमीला साबणे हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
त्यानंतर खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मध्ये हलवले असून त्याच्यावर उपचार सुरू असून पायाला गंभीर स्वरूपाचे फ्रॅक्चर आहे. पुढील उपचारासाठी एमजीएम कामोठे येथे हलवण्यात येणार आहे.