कासू ते इंदापूर काँक्रीटीकरणाची निवीदा निघणार

खा.सुनील तटकरे यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी करण्यासाठी आज केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असता कासू ते इंदापूर मार्गाचे पुर्णतः काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात मान्यता देऊन निवीदा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पळस्पे ते कासू यादरम्यानच्या रस्त्याबाबत देखील निवीदा प्रक्रीया अंतिम मार्गावर असून लवकरच त्याची देखील निवीदा निघेल असा विश्‍वास खा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

गेली दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत खा सुनील तटकरे यांनी संसदेत प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी त्यांनी हा महामार्ग रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांसह गोवा राज्यासाठी देखील महत्वपूर्ण असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नैसर्गिक परिस्थितीमुळे वारंवार दुर्दशा होत असलेल्या आणि बराच काळ रखडलेला हा मार्ग पुर्ण करण्यासाठी या महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी लावून धरले. याच संदर्भात त्यांनी आज केंद्रीय रस्ते व महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या चर्चेदरम्यान, सकारात्मक रित्या चर्चा करताना नितीन गडकरी यांनी कासू ते इंदापूर मार्गाचे पुर्णतः काँक्रीटीकरण करण्यासंदर्भात मान्यता देऊन निवीदा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पळस्पे ते कासू यादरम्यानच्या रस्त्याबाबत देखील निवीदा प्रक्रीया अंतिम मार्गावर असून लवकरच त्याची देखील निवीदा निघेल असा विश्‍वास खा सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version