| मुंबई | वार्ताहार |
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका जाहिरातीत टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकरचं नाव, आवाज आणि छायाचित्र वापरण्यात आलं होतं. एका व्हिडीओला सचिनचा आवाज देऊन मिम्सही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. या गंभीर प्रकरणाची सचिनने दखल घेतली असून, मुंबई क्राईम ब्रँचकडे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली असून, याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे