वेळवली येथे टेनिस क्रीकेट स्पर्धेला सुरुवात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खारीकपाडा येथील विघ्नहर्ता युवक मंडळाच्यावतीने दोन दिवसीय ओव्हरआर्म टेनिस क्रीकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी 27 नोव्हेंबर रोजी वेळवली येथील बहिरीमाता क्रिकेट मैदानात कावीरचे सरपंच राजेंद्र म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी काविर ग्रामपंचायतीचे सतिश भगत, कुरुळ ते चिंचोटी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र ठाकूर, सचिन पाटील, राजेंद्र मानकर, आकाश भगत, सुरज भगत, चंद्रकांत ठाकूर, सौरभ मानकर, सुशांत ठाकूर, विपूल ठाकूर, ऋतुराज ठाकूर, ऋषभ ठाकूर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
स्थानिक क्रीकेट खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपिठ मिळावे यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघाने सहभाग घेतला आहे. रविवारी 28 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यानंतर प्रथम क्रमांकास रोख 12 हजार रुपये व चषक, द्वीतीय क्रमांकाला रोख 07 हजार रुपये व चषक ,तृतीय क्रमांकाला रोख 04 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलंदाज, मालिकावीर म्हणून खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक सामन्यात सामनावीर म्हणून खेळाडूला चषक देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Exit mobile version