महाडमध्ये दोन समाजामध्ये तणाव

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| महाड | प्रतिनिधी |

महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक भावना दुखावणारा आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी (रा. करंजखोल, ता. महाड) याने 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12.45 वाजता व्हॉट्सॲप स्टेटसवर एका समाजाच्या श्रद्धास्थानांविषयी अश्लाघ्य व घाणेरडी भाषा वापरून मजकूर पोस्ट केला असल्याचे नमूद केले आहे. या पोस्टमुळे तक्रारदार तसेच स्थानिक समाजातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्याचे सपोनि शिवराम खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करण्यात आली.

सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी शांतता असून, पोलिसांनी हद्दीत सतत गस्त सुरू ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाड शहर अध्यक्ष पराग वडक यांनी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version