बांग्लादेशात तणाव; अद्याप संघाची घोषणा नाही

| ढाका | वृत्तसंस्था |

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ऑगस्टपासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण दोन सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. मात्र बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून भयानक स्थिती आहे. त्यामुळे अद्याप बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही. मात्र बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशचे खेळाडू या निर्णयानंतर लवकरच पाकिस्तानच्या दिशेने रवाना होतील.

पाकिस्तान-बागंलादेश कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे होणार आहे. बांगलादेशने या वेळापत्रकात बदल केला आहे. बांगलादेश या मालिकेसाठी 17 ऑग्सटला रवाना होणार होती. मात्र आता टीम 12 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसाठी कूच करणार आहे. तसेच दुसर्‍या बाजूला बांगलादेश कोचिंग स्टाफमधील विदेशी सदस्यांना सराव सत्रात सहभागी होता येणार नाही. कारण बांगलादेश दूतावासाने देशातील अराजकतेमुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. उभयसंघातील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप साखळीचा भाग आहे. पहिला सामना हा 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडीत आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना कराचीत खेळवण्यात येणार आहे. पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश क्रिकेट टीम 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान गद्दाफी स्टेडियममध्ये सराव करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्ट रोजी इस्लामाबादला रवाना होणार आहे. इस्लामाबाद येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेश 2020 नंतर पहिल्यांदा पाकिस्तान दौरा करत आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना- 21-25 ऑगस्ट, रावळपिंडी
दुसरा सामना- 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर, कराची
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम

शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.
Exit mobile version