दहावी,बारावी निकालाचे निकष दोन दिवसात

मुंबई | प्रतिनिधी |
सीबीएसईनंतर आता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालाचे निकष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सोमवारी (21 जून) किंवा मंगळवारपर्यंत (22 जून) राज्य मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेच्या निकालाचे निकष जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे निकष काय असतील? याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ निकष तयार करण्याचे काम करत आहे. आतापर्यत शिक्षण विभागाच्या बारावी परीक्षेच्या निकष ठरवण्याबाबत सात बैठका झाल्या आहेत. शिक्षणमंत्री, सचिव, शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करुन बारावी परीक्षेच्या निकषांबाबतचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

सीबीएसईप्रमाणे दहावी, अकरावी ,बारावीचे गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरले जातील का? असा प्रश्‍न असला तरी राज्य मंडळाने तयार केलेला निकष काही प्रमाणात सीबीएसईपेक्षा वेगळा असणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिक्षण विभागाची शनिवारी होणार्‍या महत्त्वाच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. निकालाच्या निकषांवर अंतिम निर्णय घेऊन लवकरच सोमवार किंवा मंगळवारपर्यंत हा निर्णय जाहीर केला जाईल.

Exit mobile version