|अलिबाग | भारत रांजणकर |
जुना पुणे मुंबई हायवे, शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये एक खाजगी बस दोनशे फूट खोल दरीमध्ये कोसळलेली आहे. यामध्ये 40 ते 45 लोक असून यामधील सात ते आठ लोक मयत झाल्याचे व वीस ते पंचवीस लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मदतकार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण व खोपोली नगापलिका रुग्णालय व एमजीएम रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. स्पॅाटवर अपघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टिम आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. सुखकर्ता ट्रॅव्हल्स गोरेगाव या खाजगी बस मध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव (मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.