चौलमध्ये भीषण अपघात; कार पलटी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
रेवदंडा- चौल मार्गावर शनिवारी (दि.13) सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कार पलटी झाली. मालेगाव येथील पर्यटक या एमएच 16 बीसी 0012 या क्रमांकाच्या कारमधून प्रवास करीत होते. यावेळी विठोबा मंदिराजवळ आले असता चालकांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.

पर्यटनस्थळे खुली केल्यापासून रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अतिवेगाने, मद्यप्राशन करुन वाहन चालविल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन वाहन चालविल्यामुळे हे अपघात घडत आहेत.

शनिवारी रेवदंडा-चौल मार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने जखमींना बाहेर काढले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Exit mobile version