। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कशेळे ते खांडस रस्त्यावर मार्गाचीवाडी येथे ३० मे रोजी दुचाकी यांच्यात अपघात झाला. हा आपघात दोन मोटार सायकली एकमेकांवर समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
कर्जत तालुक्यातील नागेवाडी गावातील तरूण महादू थोरड हा आपली मोटारसायकल वरून जात होता.त्या दुचाकीवरील एक सहा वर्षीय आणि आणखी एक एक वर्षाचा मुलगा आणि विष्णू बांगरा असे चौघे हे दुचाकी वरून जात होते. या अपघातात दुचाकीस्वार महादू थोराड यांचा मृत्यू झाला असून तर विष्णू बांगारा आणि दुसऱ्या दुचाकी वरील मोहन पारधी असे तिघे जखमी झाले.हे दोन्ही तरुणांवर पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कशेळे-खांडस रस्त्यावर भीषण अपघात; एकाच मृत्यू एकजण गंभीर जखमी
