मुंबई गोवा महामर्गावर भीषण अपघात; ४ जण जखमी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई गोवा महामर्गावर रामवाडी ब्रिजवर पहाटे ३ च्या सुमारास मारुती इको व आयशर टेम्पो मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जण जखमी झाले असून जखमींनमध्ये 3 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

मारुती इको (MH 04 HF 2616) मंडणगडवरून मुंबईकडे जात असताना पेण रामवाडी ब्रीजवरील बंद पडलेल्या आयशर (GJ 16 AU 5286) टेम्पोला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला यात जीवित हानी झालेली नसून दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संजय राम सुर्वे (28) चालक, चंद्रकांत बालाजी चव्हाण वय (30), राजन राम सुर्वे (33), रुद्र राजन सुर्वे वय (3) अशी जखमींची नावे आहेत. सर्व अपघातग्रस्तांना अपघातग्रस्तांना कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारातही दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version