मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! ट्रेलरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई – गोवा महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच असून सोमवारी (दि. 2) रोजी सकाळी 7.15 वा.आंबेवाडी नाका येथील शिवकांत गॅरेज व  विजय वाईन शॉप दुकानासमोर ट्रेलरनी मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यु झाला असल्याची घटना घडली आहे.

या घटनेबाबत कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबेवाडी नाका येथे आपल्या ताब्यातील ट्रेलर वाहन चालक सायरलाल खमाण गुजर (33) रा.  अजमेर राजस्थान यांनी रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटार सायकल चालक विजय कुमार सिन्नदुराई गोकगिलिखान (37) रा. तामिळनाडू याला जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला, असुन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सपोनि एस ए कुलकर्णी नागोठणे यांच्या मार्गदर्शनाखाली  कोलाड पो. अंमलदार एस जी भोजकर,अंमलदार सी. के कुथे करीत आहेत.

Exit mobile version