भीषण अपघात! कार झाडावर आदळली; तरुणाचा जागीच मृत्यू

| रसायनी | प्रतिनिधी |

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील चौक वावंढळ हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघांना गंभीर दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी (दि.2) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर पनवेल दिशेकडे जाणाऱ्या (एमएच-48-ए-157) कारचा वावंढळ हद्दीत अपघात झाला. कायम अपघातग्रस्त असेलल्या पुलाजवळ वळणावरील झाडावर आदळल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला. हा अपघात इतका भयानक होता की, त्यामध्ये गाडीची चाके निखळली असून काही ठिकाणी गाडीचे तुकडे झाले आहेत. या अपघातात उत्तम जाधव (28) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला; तर दोघांना पनवेल कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेही अत्यवस्थ सल्याचे समजले आहे. यापुर्वीदेखील या वळणावर अनेक अपघात झाल्याची नोंद पोलीस ठाणे व रस्ते देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीच्या दप्तरी आहे.

अपघात झाला कि, तात्पुरती दुरुस्ती केली जाते. या पुलाच्या व वळणाच्या दुरूस्तीवर एवढा खर्च झाला आहे की, यात दुसरा पुल तयार होऊन वळण देखील सरळ करता येईल. तसेच, वळण काढण्यासाठी देखील जागा उपलब्ध आहे. असे असतानाही यंत्रणा किती बळी घेऊन हे काम करणार, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version