शिक्षिकेचं भयानक कृत्य; विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्याच्या नूमवि शाळेतून ही घटना समोर आली आहे. शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिक्षिका जेव्हा वर्गात शिकवण्यासाठी आल्या तेव्हा मुले एकत्र बोलत बसले होते. शिक्षिका येताच ती मुले पुन्हा जागेवर गेली. मुले जागेवर गेल्याचं पाहून शिक्षिकेनं एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याचे दोन्ही हात पिरगळले आणि कचऱ्याच्या डब्यात तोंड घालून त्याला मारल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

मुलाला मारहाण झाल्यानंतर शिक्षिकेने त्याला धमकीसुद्धा दिली. कोणाला सांगायचे त्याला सांग असा दम शिक्षिकेने दिला. 7 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मात्र वार्षिक परीक्षा जवळ असून नापास करतील या भितीने विद्यार्थ्याने याबाबत कुणालाही सांगितलं नाही. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Exit mobile version