सीमेवरील दहशतवाद खपवून घेणार नाही

सरलष्करप्रमुखांचा पाक,चीनला इशारा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सीमेवरील पाक आणि चीन पुरस्कृत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, जर आम्हाला भाग पाडलंत, तर, मोठी किंमत वसूल करु,असा सज्जड दम सरसेनापती मनोज नरवणे यांनी पाक आणि चीनला दिलेला आहे. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सीमाभागातील घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांच्या मुद्द्यांवर पाकिस्तान आणि चीनला इशारा दिला आहे.
भारत आणि चीन यांच्यादरम्यान बुधवारी 14वी सैन्यस्तरावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये लष्करप्रमुख नरवणे ह देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सीमाभागातील घुसघोरी आणि पाकिस्तान, तसेच चीनसोबतचे भारताचे संबंध याविषयी भूमिका स्पष्ट केली.
एकीकडे देशात करोनाच्या संकटाशी सामना सुरू असताना दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून कागाळ्या सुरूच असल्याचं दिसून येत आहे. सीमाभागात दहशतवाद्यांकडून वारंवार घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न भारतीय जवानांकडून हाणून पाडले जात असले, तरी यातून पाकिस्तानचा छुपा अजेंडाच वारंवार सिद्ध होताना दिसत आहे. या सर्व मुद्द्यांवर भारताचे लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून नरवणे यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला असून कारवाईसाठी भाग पाडल्यास मोठी किंमत वसूल करू, असं देखील नरवणे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version