| ठाणे | प्रतिनिधी |
कुविख्यात दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा साकिब नाचण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.28) घडली आहे. भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली हे साकिब नाचण याचं मूळगाव आहे. त्यानंतर, बोरिवली आणि पडघा या दोन्ही ठिकाणी 200 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
मुंबई सिरीयल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता. त्यानंतर आय.एस.आय.एस.आय मोड्युलमध्ये डिसेंबर 2023 मध्ये एनआयए ने पुन्हा त्याला अटक केली होती. दिल्ली येथील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तिथे ब्रेन स्टॉक आल्याने पुढील उपचारसाठी साबिकला दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. साकिब नाचन याचा मृतदेह भिवंडी येथील बोरवली गावात आणण्यात येणार आहे, त्यामुळे कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटात सहभाग
मुंबईतल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी 2002-2003 दरम्यान मध्ये साकिबचं नाव चर्चेत आलं. 1990 पासूनच साकीब तपासयंत्रणांच्या रडारवर होता, त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान 11 खटले चालले आहेत आणि साधारण 15 वर्ष तो तुरुंगातही जाऊन आला आहे. एकेकाळी ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं. 3 ऑगस्ट 2012 रोजी भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे मनोज रायचा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, त्यातही साकीब आरोपी होता, याशिवाय गोरक्षकांचे वकिल ललित जैन यांची 2002 साली हत्या करण्यात आली होती, त्यातही तो आरोपी होता.






