ठाकरे,शिंदे गटाच्या वादात नेरळच्या शाखेला टाळे

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथे असलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळे फोडून घोषणाबाजी केली होती. त्यानंतर हा वाद नेरळ पोलीस ठाणे येथे पोहचला होता, तेंव्हापासून नेरळ बंदोबस्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे लावण्यात आला आहे.मात्र नेरळ शाखा कार्यालय प्रकरणी नेरळ पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. दोन्ही बाजूंनी संभाव्य धोका लक्षात घेवून नेरळ पोलिसांनी तेथे बंदोबस्त तैनात केला असून एक पोलीस अधिकारी आणि दहा पोलीस शाखा कार्यालयाबाहेर बंदोबस्त करीत आहेत. मात्र घटना घडून तीन दिवस लोटले असून पोलिसांकडून घरफोडी किंवा दरोडा असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबत माहिती घेतली असता नेरळ शिवसेना शहर शाखेची वास्तू ही माजी शहरप्रमुख संजय वसंत मनवे यांच्या मालकीची आहे. त्या जागेची मालमत्ता कार्ड आणि ग्रामपंचायत चे असेसमेंट तसेच घरपट्टी देखील संजय वसंत मनवे यांच्या मालकीची आहे. त्यांनी ते सर्व पेपर नेरळ दिले असून शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर तसेच नेरळ मधील सात पदाधिकारी यांच्या त्या निवेदनावर सह्या आहेत. मात्र या प्रकरणी शिंदे गटाकडून देखील आपल्याकडे जागेची कागदपत्रे असल्याचा दावा केला असल्याचे नेरळ पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे संजय मनवे आणि हेमंत क्षीरसागर यांनी त्यांच्याकडील कागदपत्र दाखवावी अशी मागणी केली आहे. त्यांच्याकडे कागदपत्र नसतील तर गुन्हा करावा अशी मागणी केली आहे.

त्याचवेळी नेरळ शिवसेना शाखा कार्यालयाची चावी पुन्ह ताब्यात देवून शाखा कार्यालयातून नियमित कामकाज करता यावे अशी मागणी शहर प्रमुख क्षीरसागर यांनी पोलिसांकडे केली आहे. तर पोलिसांकडून संजय मनवे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र ही तपासण्यासाठी शासकीय कामकाज दिवशी सिटी सर्व्हेअर कडे पाठविली आहेत, तेथे खात्री केल्यानंतर नेरळ शिवसेना शाखा कार्यालयाची मालकी नक्की कोणाची आहे हे निश्‍चित होणार आहे. त्यामुळे उद्या सोमवारी त्याबाबत निर्णय पोलिसांना सिटी सर्वेअर कडून मिळणार आहे. त्यानंतर पोलीस कोणती भूमिका घेतात याकडे दोन्ही बाजूकडील शिवसैनिक यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोलीस बंदोबस्तात महाराजांना अभिवादन….
नेरळ शाखा कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त आहे,त्यामुळे शहर हेमंत क्षीरसागर आणि जागा मालक संजय मनवे यांच्या मागणीनंतर सकाळी नेरळ पोलिसांनी शाखा कार्यालय उघडले आणि पोलिसांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.त्यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे आणि जागा मालक संजय मनवे आणि शहर प्रमुख हेमंत क्षीरसागर यांनी अभिवादन केले,त्यानंतर सतत उघडे असणारे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बंद करण्यात आले.

Exit mobile version