। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची उद्या रविवार, दि.11 जानेवारी रोजी शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) संयुक्त सभा होणार आहे. या महत्त्वपूर्ण सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची ही पहिलीच संयुक्त जाहीर सभा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले आहे. राजकीय वर्तुळात या सभेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेमध्ये ठाकरे बंधू कोणते राजकीय संदेश देतात आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.







