। उरण । वार्ताहर।
विद्यमान शिंदे सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढून सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त केला.
सध्याचे राज्य सरकारने सूडाच्या भावनेत शिवसैनिकांवर अत्याचार सुरु केले आहेत.सरकार विरूद्ध बोलेल त्याला पोलीसी खाक्या दाखवणं ,धमक्या देणे ,तडीपार करणे अशा अन्यायकारक गोष्टी सुरू केल्या आहेत. म्हणूनच उरण येथून नवी मुंबई येथे सकाळी 11वाजता विद्यमान सरकारच्या हुकूमशाही व मनमानी कारभाराचा निषेध करत सरकार विरोधात तडीपार मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, भास्कराव जाधव, खा. विनायक राऊत, खा. राजन विचारे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,आ. अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू, आ.मनीषा कायंदे, आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे, मनोहर भोईर, विनोद घोसाळकर, सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख केदार शिंदे, बबनदादा पाटील, विट्ठल मोरे, द्ररकानाथ भोईर, शिरीष घरत, उपनेत्या अनिता बिर्जे, महिला जिल्हाप्रमुख सुवर्णा जोशी, आदी सहभागी झालेले होते.
विद्यमान सरकार ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांवर विविध अत्याचार, जुलूम करत आहे. मात्र सरकारच्या या हुकूमशाहीला शिवसैनिक अजिबात घाबरणार नाही. कोणावरही अन्याय झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याच्या नेहमी पाठीशी उभी राहील, शिवसैनिकांनो तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत
– आ. भास्कर जाधव,शिवसेना नेते