कर्जत बाजार समितीसाठी ठाकरे गटाचे अर्ज दाखल

| नेरळ-कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी ठाकरे गटातर्फे अर्ज सादर करण्यात आले. यामध्ये अ‍ॅड. संपत हडप समीर पेठे (ग्रा.पं.मतदार संघ सर्वसाधारण), रेणुका मिरकुटे (अनुसूचित जमाती) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख उमेश सावंत, पंचायत समिती संघटक प्रशांत शिंदे, साहिल गोरे, आकाश पेठे, पराग आंबवणे, प्रमोद सावंत हे उपस्थित होते.

बाजार समितीच्या 18 जागांसाठी 55 उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले असून महाविकास आघाडी विरुद्ध युती अशी लढत होणार आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मधून 11 संचालक निवडले जाणार आहेत. त्यातील 7 संचालक हे सर्वसाधारण गटातून तर दोन महिला तर अनुसूचित जाती-जमाती गटातून दोन संचालक निवडले जाणार असून मागासवर्गीय गट आणि भटक्या विमुख्य जाती गटातून प्रत्येकी एक, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक या गटातून एक असे 11 संचालक निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत विभागातून चार संचालक निवडले जाणार असून त्यात दोन सर्वसाधारण गटातील तर अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल या गटा मधून प्रत्येकी एक संचालक निवडले जाणार आहेत. तर व्यापारी अडते गटातून दोन आणि हमाल तोलारी गटातून एक असे एकूण 18 संचालक निवडले जाणार आहेत.

नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 18 संचालक यांच्यासाठी एकूण 55 उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. या सर्व दाखल अर्जाची छाननी 5 एप्रिल रोजी होणार. 6 एप्रिल रोजी वैद्य उमेदवार यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तर 6 एप्रिल पासून 20 एप्रिल या कालावधीत नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे. तर आवश्यतेनुसार 30 एप्रिल रोजी निवडणूक होईल आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे.

Exit mobile version