| पनवेल | वार्ताहर |
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून उभ्या करण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी व्हावेत यासाठी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील यांनी जेजुरी येथे खंडेरायाला साकडे घातले आहे. बबन पाटील यांनी शिवसैनिकांच्या साथीने जेजुरी येथे जाऊन खंडोबाचा गोंधळ घातला व पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकवू दे व लोकसभा निवडणुुकीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, असे साकडे घातले आहे.