गावोगावी भेटी देण्यावर भर
| नेरळ | प्रतिनिधी |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत तालुक्यात शिवजनसंपर्क अभियान सुरू केले असून, आतापर्यंत त्यांनी कर्जत तालुक्यातील अनेक गावांना, वाड्यांना भेटीगाठी देऊन नवा-जुना बाळासाहेबांचा सैनिक जागवला आहे. पथराज जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गाव आणि आदिवासी वाडीमध्ये जाऊन गावबैठका या अभियान अंतर्गत घेतल्या जात आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवजनसंपर्क राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात कर्जत तालुक्यातील सर्व सहा जिल्हा परिषद गटामध्ये तसेच कर्जत आणि माथेरान नगरपरिषद तसेच खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट आणि खोपोली नगरपरिषद तसेच खालापूर नगरपंचायत येथे शिवजनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. अभियानात कर्जत तालुक्यातील घरोघरी जावून कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभियानात नितीन सावंत यांच्यासह शिवसेना कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक बाबू घारे, तसेच महिला आघाडी संघटक करुणा बेडकर, कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत आणि स्थानिक सर्व पदाधी हे गावोगाव आणि वाडी वस्तीत जाऊन अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.