मोगॅम्बो खूष हुआ; ठाकरेंची शाहंवर टीका

| मुंबई | प्रतिनिधी |
शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चोरुन नेल्यामुळे मोगॅम्बो खूष हुआ,अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे. पुण्यातील कार्यक्रमात शाह यांनी ठाकरेंवर टीका केली होती.त्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले काल पुण्यात कोणी आलं होतं, त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ, अशी टीका ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय शाह केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्या ते बोलत होते.

Exit mobile version