। पनवेल । प्रतिनिधी ।
थायलंड येथून तस्करीने आणलेला हायड्रो गांजा बाळगणाऱ्या खारघरच्या एका तरुणाला नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणाच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख संदीप निगडे यांनी ही कारवाई केली. पोलिसांना खारघर येथील सेक्टर 19 येथील उद्यानासमोरील एका इमारतीमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्या मोटारीची झडती घेतली असता त्याच्याकडे 800 मिलीग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा सापडला. तसेच प्लास्टिक पिशव्या, गांजा बारीक करण्यासाठी क्रशर आणि वजनकाटा पोलिसांना सापडला. अटकेत असलेल्या तरुणाच्या दोन मित्रांनी त्याला हा गांजा विक्रीसाठी दिला असून त्यांनी थायलँड देशातून छुप्या मार्गाने त्याची तस्करी उघड झाले आहे.







