। मुंबई । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्यावतीने आणि उजाळा क्रीडा मंडळाच्या सहकार्याने दि.29 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय जाईबाई काशीनाथ पाटील क्रीडांगण, वळगांव, भिवंडी या पटांगणावर माऊली स्पोर्ट्स-कल्याण विरुद्ध वारीअर्स क्रीडा मंडळ-डोंबिवली या महिला गटातील लढतीने स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पुरुषांच्या अ गटात 57, ब गटात 24, महिला गटात 41, तर पुरुष व्यावसायिक गटात 68 संघांनी सहभाग घेतला आहे. कुमार गटात 28 संघानी भाग घेतला असून त्यांची 9 गटात, तर कुमारी गटात 40 संघांनी सहभाग घेतला असून त्याची 13 गटात विभागणी करण्यात आली आहे. कुमार व कुमारी गटाचे सामने प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येतील, तर इतर सर्व गटाचे सामने बाद पद्धतीने खेळविले जातील. या स्पर्धेतून ठाणे जिल्ह्याचे संघ निवडण्यात येऊन ते महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यावतीने घेण्यात येणार्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण र्ीिेीीींेींं या े.ीं.ीं. प्लँटफॉर्मवर दाखविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज, बुधवारी सायं. 5.30 वाजता केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष व माजी आ.योगेश पाटील, उपाध्यक्ष व वळगांवचे सरपंच श्रीराम भोईर, वळगांवचे उद्योजक वसंत भोईर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.