| ठाणे | प्रतिनिधी |
हरियाणा येथे नुकत्याच 69 वी राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ठाण्याच्या टीएमसीएपीवाय खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली. या स्पर्धेच्या 19 वर्षांखालील मुलांसाठी (मुले आणि मुली) श्रेष्ठा शेट्टी हिने लांब उडीमध्ये 5.69 मीटर उडी आणि 4 बाय 100 मीटर रिलेसह सुवर्णपदक जिंकले. गिरिक बंगेरा याने 400 मीटरमध्ये 48.20 सेकंद अशी कामगिरी करत 400 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले. टीएमसीएपीवाय योजना प्रमुख मीनल पलांडे आणि अशोक आहेर यांनी प्रशिक्षक नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ॲथलेटिक स्पर्धेत ठाण्याला चार पदके
