आजपासून दहावीची परीक्षा सुरु

| अलिबाग | प्रतिनिधी |

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा आज शुक्रवार (दि. 01) पासून सुरु झाली आहे. ही परीक्षा 26 मार्चपर्यंत असणार आहे. एकूण 74 केंद्रांमध्ये 37 हजार 277 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेस बसले आहेत. तसेच, परीक्षेच्या कालावधीत कोणतीही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत.


पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दोन या वेळेत मराठी विषयाचा पेपर आहे. दहावीच्या परीक्षेची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. परीक्षा कधी सुरु होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर ही उत्कंठा संपली आहे. आजपासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले असून अलिबागमधील अरुण कुमार वैद्य हायस्कुलच्या बाहेर विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Exit mobile version