उद्यापासून बारावीची परीक्षा

33 हजार विद्यार्थी देणार लेखी परीक्षा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मंगळवार (दि. 10) पासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील तब्बल 33 हजार 121 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, 52 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले असून, कॉपी करणाऱ्यांवर विशेष पथकांमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. 18 मार्चपर्यंत या परीक्षा सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक मानल्या जातात. या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीची दिशा ठरते. विविध क्षेत्रांची निवड करण्याची संधी या परीक्षेनंतर उपलब्ध होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचेही या परीक्षेकडे विशेष लक्ष लागून होते. विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करून तयारी पूर्ण केली असून, पालकांनीदेखील त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 52 केंद्रांवर परीक्षा होणार असून, विद्यार्थ्यांची झडती घेण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावर एकूण 24 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्यात एक तसेच जिल्हा स्तरावर स्वतंत्र भरारी पथक कार्यरत राहणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यांची सतत पाहणी केली जाणार आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास भरारी पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करणार आहे.

कॉपी करणाऱ्यांसह कॉपी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, प्रतिबंधात्मक आदेश लागू केले जाणार आहेत. परीक्षा केंद्रांच्या आसपास असलेली झेरॉक्स दुकाने व इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही परिसरावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रातील व परिसरातील प्रत्येक हालचालीवर प्रशासनाची नजर राहणार आहे.

परीक्षार्थींवर दृष्टीक्षेप

तालुकेविद्यार्थी केंद्र
पनवेल – 1225212
उरण –21473
खालापूर – 24464
कर्जत – 27485
सुधागड – 6991
पेण – 20964
अलिबाग – 26716
मुरूड – 5351
रोहा – 17524
माणगाव – 17284
तळा – 2361
म्हसळा – 6121
श्रीवर्धन – 7491
महाड – 21854
पोलादपूर – 265 – 12651
3312152
Exit mobile version