विरारमध्ये जानेवारीत रंगणार 19 वे जागतिक मराठी संमेलन

| वसई | वार्ताहार |

जागतिक मराठी अकादमी तर्फे आयोजित शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलन येत्या 13 आणि 14 जानेवारी रोजी विरार मध्ये रंगणार आहे. जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुराणिक संमेलनाचे उद्धाटन करणार आहेत. जागतिक मराठी अकादमीतर्फे दरवर्षी शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदाचे 19 वे वर्ष असून यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाची माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जपानमधील उद्योजक आणि आमदार योगेंद्र पुराणिक या संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत. त्यांना विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजिवनी खेर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. ‌‘मनुस्मृती ते मंडल आयोग’, ‌‘कृत्रिम बुध्दीमता’, ‌‘मराठी चित्रपटाचे भवितव्य’ आदी विविध विषयांवर या संमेलनात परिवसंवाद रंगणार आहेत. ‌‘मनुस्मृती ते मंडल आयोग’ या विषयावरील परिसंवादात रावसाहेब कसबे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहे. चित्रशिल्प काव्य यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य असणार आहे. आयोजनाची सर्व जबाबदारी आमच्या ट्रस्टतर्फे केली जाणार असल्याची माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

Exit mobile version