| पुणे | प्रतिनिधी |
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (45, रा. सांगली, विकास चौक) याचा मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
समीर गायकवाड हा सध्या पॅरोलवर बाहेर होता. त्याला प्रत्येक रविवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजेरी होती. जामिनावर बाहेर असल्यापासून तो पत्नीसह सांगलीतील विकास चौक परिसरातील घरात रहात होता. रविवारी रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच उपचारांदरम्यान त्याचा पहाटे मृत्यू झाला, अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.






