माझी वसुंधरा निमित्त प्रशासकीय यंत्रणा सज्ज

पनवेलमध्ये कार्यशाळा संपन्न

| पनवेल | वार्ताहर |

पर्यावरणातील बदल लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान 4.0 हा कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा, प्रत्येक यंत्रणेने या अभियानात सक्रीय व्हावे, असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. माझी वसुंधरा अभियान 4.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व आझादी का अमृत महोत्सवांतर्गत मेरी माती मेरा देश अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त’ आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालय व पनवेल महानगरपालिका यांच्या विद्यमाने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बास्टेवाड, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, विभागीय वन अधिकारी ठाणे कांचन पवार, विभागीय वन अधिकारी रायगड स्वप्नील धुरे, पनवेल महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (नगरपालिका प्रशासन) रवींद्र जाधव, उपाायुक्त (विकास) गिरीष भालेराव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे गणेश जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.प. ठाणे प्रमोद काळे तसेच कोंकण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी, उपस्थित होते.

Exit mobile version