अफगाणचा प्रवास अखेर थांबला; तीन विश्वविजेत्यांना धूळ चारली

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अविस्मरणीय कामगिरी केलेल्या अफगाणिस्तान संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. शेवटच्या साखळी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तानने चिवट झुंज दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 50 षटकांत सर्वबाद 244 धावांवर आटोपला. अजमतुल्ला ओमरझाईने नाबाद 97 धावा केल्या. ओमरझाई वगळता अफगाणिस्तानचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने चार बळी घेतले.

अफगाणिस्तानने या स्पर्धेत तीन विश्वचषक जिंकलेल्या पाकिस्तान, श्रीलंका आणि गतविजेत्या इंग्लंडला नमवण्याची कामगिरी केली. यामध्ये सलग तीन सामने जिंकण्याचीसुद्धा कामगिरी केली. धावांचा पाठलाग करून त्यांनी दोनवेळा बाजी मारली. प्रशिक्षक अजय जडेजा आणि जोनाथन ट्रॉट यांच्या मार्गदर्शनातील संघाने चमकदार प्रवास केला. अफगाण फिरकी मारासुद्धा संपूर्ण स्पर्धेत भेदक राहिला.

Exit mobile version