जिल्ह्यात ‘जय भिम’ चा गजर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपात हा सण साजरा केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरी केली जाते. आंबेडकरवादी लोक या दिनाला समता दिन म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयातर्फे महामानवास अभिवादन

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जंयती निमित्ताने प्रतिमेला मंचाचे अध्यक्ष सखाराम अण्णा पवार आणि जेष्ठ नागरिक संघाचे गजेंद्र दळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी यांनी केले. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचाचे सल्लागार अध्यक्ष श्रीरंग घरत, जगदीश नागे, नंदु तळकर, आर.के. घरत, विनोद टेंबुलकर, अँड. राजेंद्र जैन, उल्हास पवार, उमेश पवार, भालचंद्र वर्तक, मंदार कुळकर्णी, चारुशीला कोरडे, उत्कर्षा पवार, मनश्री पवार, हर्ष पवार आदी यावेळी उपस्थित होते.

म्हसळ्यात महामानवास अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा आणि नगरपंचायत कंत्राटी कामगार संघ म्हसळा शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी काढलेल्या मिरवणुकीत लहानथोर समाज बांधव उन्हातान्हाची पर्वा न करता उत्साहात सहभागी झाले होते.


तसेच, महामानवाला अभिवादन करण्यापूर्वी समाजमंदिरासमोरील भव्य प्रांगणात समता सैनिक दलाच्या सैनिकांच्यावतीने ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी ऋषाद येलवे, विनोद जाधव, संतोष वारे, अनंत कासारे, महादेव साळवी, निलेश जाधव, भागूराम कांबळे, इम्तियाज दळवी, प्रमोद पवार, अब्दुल सलाम चोगले आणि संघटनेचे सर्व सभासद मान्यवर उपस्थित होते.

कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कर्जत नगरपरिषद कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी कार्यालयिन अधीक्षक रवींद्र लाड, लेखापाल स्वामिनाथ खारतोडे, विद्युत इंजिनियर सुनील लाड, कल्याणी लोखंडे, जयेश घरत, रुपेश पाटील, बापू बहिरम आदी कर्मचारी उपस्थित होते.

देवकान्हे येथे नामफलकाचे अनावरण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून देवकान्हे येथे लुंबिनी नगर नामफलकाचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. विश्‍वनाथ जाधव यांच्या हस्ते या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी दयाराम भोईर, चंद्रशेखर कांबळे, जगदिश जाधव, किशोर गायकवाड, दिपक मोरे, विठ्ठल जाधव, सागर गायकवाड, संदेश गायकवाड, नागसेन जाधव, संजय जाधव, किसन वाघमारे, राज जाधव, किशोर गायकवाड, सुप्रिया जाधव, संजीवनी जाधव, कमल जाधव, अर्चना जाधव, जान्हवी जाधव, सुमती जाधव, प्राची गायकवाड, साधना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

फुले व आंबेडकर जयंती सप्ताह


श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताहानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी प्रश्‍न मंजुषा व जिवन चरित्रावर आधारित व्याख्यान, प्रतिमा पूजन इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख प्रा. किशोर लहारे यांचे यावेळी व्याख्यान झाले.

पाथरशेत येथे जयंती साजरी


रा.जि.प.शाळा पाथरशेत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मगर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य संविधान त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनी अनन्या सुदेश कोदे आणि इयत्ता तिसरीची विद्यार्थी मानस महेश कानडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.

सायकल प्रवास करत आदरांजली

नेरळ गावातील चहा विक्रेत्याच्या 11 वर्षीय मुलाने भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तब्बल 75 किलोमीटर सायकल प्रवास करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली.


पहाटे साडेपाच वाजता हिरेन राम हिसालके याने नेरळ गावातील मोहाची वाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रवासास सुरूवात केली. वांगणी, कशेळे असा पुढे कड़ाव येथून कर्जत शहरात सायकल घेऊन गेला. कर्जत येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कर्जत कल्याण रस्त्याने डिकसळ गाठले आणि तेथून कल्याण रस्त्याने नेरळ गाठले. नेरळ येथे हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती कर्जतमध्ये साजरी करण्यात आली. यावेळी कर्जत मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. रात्री बारा वाजल्यापासून भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत होते. रविवारी सकाळपासून अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यामध्ये राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांचा समावेश होता.

आंबेडकर जयंती उत्साहात


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यासाठी बौद्धवाडा, सिद्धार्थ नगर, संघर्ष नगर मांगीरदेव येथे संजय गायकवाड, आ. महेश बालदी, मुख्याधिकारी समीर जाधव, वपोनि सतिश निकम, वपोनि दिपक इंगोले, रमेश ठाकूर, कौशिक शाह, रवी भोईर, जैवीन कोळी, प्रशांत पाटील, संतोष घरत, भावना घाणेकर, चिंतामण गायकवाड, सीमा घरत, यशवंत ठाकूर, रोहित पाटील, अमृत शेठ, भूपेन घरत, नंदकुमार पाटील, संदेश ठाकूर, धनेश बोरे, घनःश्याम कडू, प्रवीण पुरु तसेच अ‍ॅड. विजय पाटील, अ‍ॅड. पराग म्हात्रे, अ‍ॅड. अर्चना माळी, अ‍ॅड. प्रतिभा भालेराव, अ‍ॅड. स्वाती कांबळे, अ‍ॅड. निकिता कासारे, अ‍ॅड. रेखा पाटील, अ‍ॅड. श्रीधर कवडे, अ‍ॅड. निवेदिता वाघमारे आदीसह मान्यवर उपस्तित होते.

कोर्लई हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कोर्लई येथील माउंट कार्मेल हायस्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युली चांदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडून निबंध स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाबाबत विद्यार्थ्यांना चित्र काढण्याचे सांगण्यात आले होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सिस्टर ज्युली चांदी, सुरेश वेगस, राजेंद्र घोसाळकर, रोशन मार्टीस, शोधन बलकवडे, शुभांगी पंची, अक्षता म्हात्रे, वित्रीन वेगस, सिस्टर शोभा त्रिभुवन, अलबर्ट मार्टीस, शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्यावतीने अभिवादन

सुधागड तालुका मराठा समाजाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर स्मारक पाली येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणपत सितापराव, सुजित बारसकर, जिवन साजेकर, अविनाश पवार, भगवान शिंदे, रवींद्रनाथ ओव्हळ, राहुल सोनावले, दामोदर ठाकूर, अरविंद दंत, सुधीर सावंत, केतन म्हस्के, शुभदा पाटील, किशोर खरीवले, अमित निंबाळकर, महेश पोंगडे, अमर लहाने, अमोल मोरे, बाळकृष्ण भोईर, शरद गोळे, सुनील साजेकर, राजेश गायकवाड, नितीन जाधव, प्रभाकर गायकवाड, नूतन शिंदे, रोहिणी जाधव यांच्यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते.

तळा तालुक्यात उत्साह

तळा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भीम अनुयायांनी तळा शहर भीममय झाले होते. तालुक्यात व शहरात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच, त्यांच्या प्रतिमेची मिरवणूकही काढण्यात आली. तळा शहरात भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन सेवा संस्था व बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेल महानगर पालिकातर्फे भव्य दिव्य मिरवणूक पनवेल शहरात काढण्यात आली. या मिरवणूकीत ढोल ताशा तसेच विविध पालिकांच्या शाळांनी चित्ररथात भाग घेत बाबासाहेबांचा इतिहास नागरिकांसमोर उभा केला.


खांदा वसाहतीमधील मूलगंधी कुटी विहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यामध्ये महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता.


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, प्रज्ञासुर्य, विश्‍वरत्न, परमपूज्य बोधिसत्व नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त, बौध्दजन समाज सेवा संघ, सिद्धार्थनगर/बेणसे यांस कडून रा.जि.प शाळा बेणसे यांस महापुरुषांच्या प्रतिमा भेट देताना पदाधिकारी व ग्रामस्थ.

Exit mobile version