। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं. या निवडणुकीनंतर आता राज्यातील महापालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे. या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अखेर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा
