| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |
इतिहासात अपराजित राहिलेला मुरूडचा जंजिरा जलदुर्ग आजही पर्यटक आणि इतिहासकारांतुन विविध कारणांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पावसाळ्यात जंजिऱ्याचे रुप तर अधिक खुलून विलोभनीय दिसत आहे.
जंजिऱ्यात दरवर्षी 25 मे पासून 31 ऑगस्ट पर्यंत जाण्यास केंद्रीय पुरातत्व खात्याकडून बंदी असते. पाऊस पडल्यानंतर जंजिऱ्यावर हिरवागार साज चढतो. मुरूडकडून राजपुरी जेट्टीकडे जाताना ही विलक्षण ऐतिहासिक वास्तू मोबाईलमध्ये बंदिस्त करायला डोंगरी सनसेट पॉईंटजवळ पाय थबक असतात. समुद्राच्या मोठ्या धडकणाऱ्या लाटा गेली 300 ते 350 वर्षे जंजिरा जबरदस्त आणि चिवटपणे झेलतो आहे. पावसाळ्यात जंजिरा पर्यटकांना आतून पाहण्यासाठी बंद असला तरी हिरवागार शालू पांघरून पहुडलेल्या जंजिऱ्याचे बाह्य रूप आणि धडकणाऱ्या लाटांचे तांडव पाहताना नेत्रसुखद रोमांच उभे राहतात.
विलोभनीय जंजिरा जलदुर्ग
