| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
श्री सोमजाई शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय पाच्छापूर येथे वार्षिक क्रीडा महोत्सव दि.18 ते 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच भगवान शिंदे व संदीप देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, हा कार्यक्रम रविकांत घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मोहत्सवाचा शुभारंभ विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर करत, क्रीडा ज्योत पेटवून. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, बुद्धिबळ, स्मरणशक्ती, गोफण नेमबाजी, प्रश्नमंजुषा, इंग्रजी स्पेलिंग लिहिणे, तसेच फनी गेम्समध्ये डब्बा फोडणे, संगीत खुर्ची इत्यादी खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक दीपक माळी, केंद्रप्रमुख अनिल राणे, पांडुरंग डिघे, एकनाथ ओंबळे, कमळाकर शिधोरे, एकनाथ चांदे, मुख्याध्यापिका माधुरी पारखे, शिक्षक वर्ग, शाळेचे माजी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दिव्या जंगम तर आभार सुचिर खाडे यांनी व्यक्त केले.







