गारंबी धरणाचा परिसर चकाचक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड-जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गारंबी येथे ‌‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‌‘एक दिवस एक तास एकसाथ स्वच्छता’ अभियान शुक्रवारी (दि.26) राबविण्यात आले. त्यांनतर त्याच परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर पाणी पुरवठा अभियंता सोनल पाटील, बांधकाम अभियंता अनिकेत वाजे, शहर समन्वयक सचिन कोरके, गाळणी चालक पल्लवी डोंगरीकर, मुकादम अभिजीत चांदोरकर, स्वप्नजा विरुकुड, अक्षता तुळसकर, विजय सुर्वे, जयकृष्ण भिसे, सतेज निमकर, स्मिता मुरुडकर यांच्यासह पाणी पुरवठा कर्मचारी व सफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.

Exit mobile version