काजूगराची आवक वाढली

शेकडा 100 ते 120 रुपये, खवय्यांना समाधान

| माणगाव । वार्ताहर ।

शिमगोत्सवात काजूगर स्वस्त झाल्याने खवय्यांनी समाधान व्यक्त केले आहे. माणगाव तालुक्यातील बाजारपेठेत गराची आवक वाढल्याने महाग मिळणारे काजू गराना स्वस्ताई आली आहे.

रानमेव्यासाठी प्रसिद्ध असलेली माणगाव तालुक्यातील बाजारपेठ ओल्या काजूच्या विक्रीचे एक केंद्र बनत आहे. आजूबाजूच्या डोंगरातील वस्तीवरून विक्रीस येणार्‍या आदिवासी महिलांना रोजीरोटीचे चांगले साधन या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. शेकडा 150 रुपये ते 200 रुपयांना मिळणारे काजूगर गेल्या काही दिवसांत आवक वाढल्याने झाले असून या दिवसात शेकडा 100 ते 120 रुपयांना मिळत आहेत. यामुळे काही दिवसापूर्वी शेकडा 200 रुपयांना काजूगर मिळत होते, मात्र गेल्या काही दिवसांत आवक वाढली असल्याने खवय्ये व पर्यटकांनी काजू खरेदी करण्याकडे पसंती दिली असून ऐन सणासुदीत काजूगर स्वस्त झाल्याने खवय्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांत सुरुवातीला काजूगर काहीसे महाग होते. आता रानातून बर्‍यापैकी काजूगर मिळू लागले आहेत. त्यामुळे थोडे स्वस्त झाले आहेत. काही दिवसांपासून 150 ते 200 रुपयांना विकले जाणारे काजूगर 120 रुपयांपासून पुढे विकले जात आहेत.

मंजुळा जाधव, काजूगर विक्रेता.

या दिवसात मिळणारे काजूगर अत्यंत चविष्ट असतात. खास गावावरून दरवर्षी आम्ही हमखास नेतो, मागवितो. आता हंगाम सुरू झाला असून काजू गर स्वस्त झाले आहेत.

बाळाराम मांडवकर, काजूगर प्रेमी
Exit mobile version