| रोहा | प्रतिनिधी |
रोहा अंजुमन इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कुल, रोहा एज्यूकेशनल अँड वेल्फअर असोसिएशन इंग्लिश मिडीयम स्कुल आणि रेवा ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामाने वार्षिक कला क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रेवा संस्थेचे अध्यक्ष रियाज शेटे व अल खैरीया कमिटीचे अध्यक्ष शफी पानसरे यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी रेवा संस्थेचे उपाध्यक्ष सलीम चोगले, सहसचिव अ.करिम खतीब, अंजुम हायस्कुल चेअरमन अ.कादीर रोगे, अल खैरिया संस्थेचे सचिव मुबीन करजिकर, रेवा खजिनदार अरिफ अधिकारी, सदस्य उस्मान रोहेकर तजम्मुल डबीर, राहील नागोठकर, अजीज महाडकर आदि मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा रेवा आणि रोहा अंजुमन हायस्कुलच्या भव्य पटांगणावर सलग 20 दिवस सुरू राहणार आहे. या स्पर्धेत कबड्डी, गोळाफेक, फुटबॉल, डॉजबॉल, लंगडी, विज्ञान प्रदर्शन, फूड फेस्टिवल, फन फेअर इत्यादी उपक्रम पार पडणार आहेत. या विविध नियोजित स्पर्धेत शाळेतील व महाविद्यालयातील शेकडो मुले मुली सहभागी होणार असल्याने 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता बक्षीस वितरण प्रसंगी विजेत्यांना उपस्थिती प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मान चिन्हा देऊन गौरविण्यात येणार आहे.
कला-क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
