मॅजिक बस फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्यावतीने वरसई येथे शालेय तथा शाळाबाह्य चिमुकल्यांचे शिक्षण तथा बालहक्क या विषयावर हसत खेळत प्रबोधन करण्यात आले. यावेळी ऋतिक कोलंबे, शिवानी माशालकर, सोनाली फणसे, सुनीता शेमडेकर, अश्विनी यांचे, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी आदी मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ तथा शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेच्या मार्गदर्शक प्रणाली पाटील तसेच उपस्थित मान्यवरांनी शालेय मुलांचे हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करत शिक्षणाचा हक्क बजाविण्याचे आवाहन केले. तर मयुरेश उंबरे यांनी बालदिन विशेष मनोरंजन केले. प्रतिक कोळी यांच्या चमुने या कार्यक्रमांतर्गत पथनाट्यातून जनजागृती केली. वरसई सरपंच रेश्मा पाटील यांच्या विशेष सहकार्याने आयोजित बालहक्क दिन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित जावरे, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकल्प व्यवस्थापक भारती भालेराव यांनी केले.







