बेकरीची दरमहा तपासणी करावी

| नागोठणे । वार्ताहर ।

नागोठणे शहरात काही महिन्यांपूर्वी एका बेकरी चालकाने छोट्या केकला थुंकी लावून केक कागदी द्रोणमध्ये देताना नागरिकांनी बघितल्यानंतर त्या बेकरी चालकावर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच गुरवार दि. 4 ऑगस्ट रोजी किंग बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदीराची लेंडी (विष्ठा) आढळून आली. तसेच या बेकरीत किळसवाणी अस्वच्छता देखील ग्रामस्थ व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून भविष्यात जर ग्रामस्थांच्या जीवितास धोका झाला तर त्यास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी वर्गच जबाबदार राहतील.

दुर्दैवाने जीवितहानी झाली तर येथील नागरिक या अधिकार्‍यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पडतील असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी प्रत्येक महिन्यात परिसरातील सर्व बेकरींची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहेत.

आम्ही प्रत्येक महिना दोन महिन्यांनी तपासणी करू. ज्या बेकरीमध्ये अस्वच्छता गलिच्छपणा आढळेल त्या संबंधित बेकरी व्यावसायिकावर आम्ही कठोरातील कठोर कारवाई करू. आमच्या अखत्यारीत येत असलेल्या व्यावसायिकांची काही तक्रार असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा.


लक्ष्मण दराडे
अन्न सुरक्षा अधिकारी
Exit mobile version