उरण शहरात प्लास्टिक बंदीचा फज्जा

। उरण । वार्ताहर ।

उरण शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. परिणामी, प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचे तसेच कचर्‍यात साचणार्‍या प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. नाले, ओढे तसेच सार्वजनिक ठिकाणी इतर कचर्‍याबरोबर प्लास्टिक पिशव्यांचा खच पडत आहे.

शहरातून दररोज सर्वाधिक जास्त घरगुती कचरा संकलित केला जातो. या कचर्‍यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्रमाण असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील दुकानदार तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री व वापर केला जात आहे. संबंधित दुकानदार तसेच विक्रेत्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने प्लास्टिक वापर व विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात हॉटेल्स, चायनीज, फळ विक्रेते, दूध विक्रेते, वडापाव विक्रेते तसेच कापड दुकानदार, भांडीविक्री करणारे व्यापारी व व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. शहरात अनेक याठिकाणी प्लास्टिक कचरा साचत असल्याचे दिसून येत आहे.

प्लास्टिकचा कचरा
शहरातून दररोज कचरा संकलित केला जातो. या संकलित कचर्‍यात सर्वाधिक कचरा हा प्लास्टिकचा असल्याचे स्वच्छता कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version